Ajit Pawar : 'जाहीरनामा दिला म्हणून कर्जमाफी, पण सारखं सारखं होणार नाही' - अजित पवार
Continues below advertisement
अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. 'जाहीरनामे दिला ते म्हणून आम्ही सारखं ते पूर्ण करू पण सारखं सारखं होणार नाही,' असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे, त्यामुळे कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारने कर्जमाफीच्या निकषांचा आणि अंमलबजावणीचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. अजित पवार यांनी स्पष्ट केले की, जाहीरनाम्यातील आश्वासन पूर्ण केले जाईल, परंतु अशा प्रकारची कर्जमाफी वारंवार दिली जाणार नाही, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement