Ajit Pawar Sharad Pawar Meeting : अजित पावर शरद पवारांच्या भेटीला, एकत्र येण्याचा दिला प्रस्ताव

मुंबई :  पावसाळी अधिवेशनाआधी अजित पवार गटाच्या मंत्र्याची  बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी ही बैठक पार पडली.  या बैठकीनंतर शरद पवार यांना भेटण्यासाठी  उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिती तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ वाय बी चव्हाण सेंटरला पोहचले आहेत. देवगिरीवर झालेल्या बैठकीला  सुनील तटकरे यांनी  मार्गदर्शन केले. बैठकीनंतर  अजित पवारांसह सर्व मंत्री वाय बी सेंटरला पोहचले. बैठकीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.  या बैठकीसाठी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखील पोहचले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola