ABP News

Ajit Pawar NCP Meeting : महायुतीचा पराभव, राष्ट्रवादीत धाकधूक; दादांसमोर आमदार वाचणार अडचणींचा पाढा

Continues below advertisement

महायुतीचा पराभव, राष्ट्रवादीच्या आमदारांत धाकधूक,  राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा मतदारसंघात घेणार जनमताचा कौल , अजित पवारांसमोर आमदार वाचणार अडचणींचा पाढा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश पाहता अजित पवारांच्या आमदारांमध्ये धाकधुक 

अजित पवार यांच्या आमदारांनी महायुतीचं काम करा असं कार्यकर्त्यांना सांगून देखील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्याने आमदारांमध्ये संभ्रमाची भावना 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वाढतं महत्त्व पाहता अजित पवारांच्या आमदारांकडून पुन्हा एकदा विधानसभा मतदारसंघातील जनमताचा कौल घेतला जाणार

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आलेल्या अडचणींचा पाढा आज अजित पवार यांच्यासमोर आमदार वाचण्याची शक्यता 

जनतेमध्ये मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, संविधान बदलणार या बाबी अधिक प्रमाणत रूचल्यामुळे जनतेशी कनेक्ट होण्यात अडचणी येत असल्याची आमदारांची भावना

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram