Ajit Pawar NCP Leaders Reactions : राष्ट्रवादी अजित पवारांचीच, भुजबळ, मुंडेंकडून निर्णयाचं स्वागत
Ajit Pawar NCP Leaders Reactions : राष्ट्रवादी अजित पवारांचीच, भुजबळ, मुंडेंकडून निर्णयाचं स्वागत
खरी राष्ट्रवादी अजित पवारांचीच....निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही आज मोठा निर्णय दिलाय.. तसंच दोन्ही गटांचे आमदार पात्र असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला. विधिमंडळ पक्षात कुणाचं बहुमत आहे हा निकष लावत नार्वेकरांनी हा निर्णय दिला. तसंच, शरद पवार गटावर ताशेरे देखील ओढले. पक्षांतर्गत मतभेद हे दहाव्या सूचीच्या अंतर्गत येत नाहीत, त्यामुळे शरद पवार गटानं आमदारांची गळचेपी करायचा प्रयत्न करू नये असं देखील अध्यक्ष म्हणाले. २ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादीत फूट पडली आणि दोन्ही गटांकडून पक्षावर दावा करण्यात आला..तसंच दोन्ही गटातील आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची याचिकाही करण्यात आली.. महिनाभर या याचिकांवर सुनावणी पार पडली आणि आज अखेर राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा निकाल देण्यात आला.