Ajit Pawar Nashik Speech : तुम्ही देवळातील घंटा पण दिली नाही, अजितदादांचा विरोधकांना टोला

Continues below advertisement

Ajit Pawar Nashik Speech : तुम्ही देवळातील घंटा पण दिली नाही, अजितदादांचा विरोधकांना टोला

नाशिक : आजपर्यंत बांधल्या नाही एवढ्या राख्या तीन दिवसांत बांधल्या आहेत. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे. आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या सिन्नर (Sinnar) विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेतील (Jansanman Yatra) सभेतून ते बोलत होते. 

अजित पवार म्हणाले की, राज्यातील यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे. यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर काय कामे केली हे सांगत आहे. भांगरे यांच्या स्मारकासाठी मागणी केली आहे. त्याची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे ते कसे पूर्ण होईल यासाठी आम्ही लक्ष देणार आहोत.  सिन्नरची वसाहत चांगल्यापैकी सुरू आहे. एमआयडीसी आणि महावितरणचे प्रमुख उदय सामंत यांना बोलावून आम्ही येथील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे करण्यासाठी माझाही प्रयत्न आहे. सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीबाबत ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram