Ajit Pawar Sharad Pawar Meet: अजित पवार आणि शरद पवारांची गुप्त भेट कशासाठी?
Ajit Pawar Sharad Pawar Meet: अजित पवार आणि शरद पवारांची गुप्त भेट कशासाठी? राजकारणात खूप काही घडतंय, म्हणूनच बुलेटीनची सुरुवात करूया एका मोठ्या आणि महत्त्वाच्या राजकीय बातमीने...ही बातमी बातमी आहे गुप्त भेटीची, तिही शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात ही गुप्त भेट झाली ती पुुण्यात आणि तिही एका उद्योगपतीच्या घरी. पवार कुटुंबाचे निकटवर्तीय असलेले उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या पुण्यातील बंगल्यावर ही भेट झाली. आणि यावेळी पवारांसोबत जयंत पाटीलही उपस्थित होते. विशेष म्हणजे ही गुप्त भेट असली तरी माझाच्या कॅमेरात बरंच काही कैद झालंय. ही भेट झाली खरी पण चर्चा रंगतेय ती लपवाछपवीची. चोरडियांच्या बंगल्याबाहेर पडताना अजितदादा गाडीत लपल्याचं माझाच्या कॅमेऱ्यात कैद झालंय. मीडियाला चकवा देण्यासाठी अजित पवार लपले खरे पण त्यांची गाडी बाहेर पडताना गेटला धडकली. आणि तेव्हाच त्या गाडीत अजित पवार असल्याचं समोर आलं