Ajit Pawar : मनपा निवडणुकांमध्ये युती करणार? अजित पवार म्हणाले...कार्यकर्त्यांची इच्छा ABP MAJHA
स्वबळावर लढलं पाहिजे, स्थानिक पातळीवर महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सूर, मात्र पक्षश्रेष्ठींचा आदेशच अंतिम असल्यांच स्पष्ट
ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांचं मनोमिलन सुरू, राणेंविरोधातल्या लढाईत अंबादास दानवेंंची महाजनांना साथ, तर कल्याण-डोबिंवलीत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची दिलजमाई
मुंबईतल्या गिरगाव आणि दादर परिसरात लागले ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर...'नवे युग नवे पर्व' असं म्हणत काका-पुतण्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...
दबाव टाकून सत्ताधारी अनुकूल प्रभाग रचना करून घेतात, मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात जितेंद्र आव्हाडांचा थेट आरोप, प्रभागरचना कार्यपद्धतीवर लक्ष ठेवण्याचीही मागणी
बच्चू कडूंच्या अन्नत्याग उपोषणाचा पाचवा दिवस, शेतकऱ्यांसह दिव्यांगांसाठी कडूंचा एल्गार...राजू शेट्टी, लक्ष्मण हाके, संभाजीराजे, रोहित पवार आज कडूंना भेटणार
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बुलढाणा आणि अकोला दौऱ्यावर...खामगावात कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश तर अकोला,वाशिम जिल्ह्याच्या आढावा बैठकीला उपस्थित राहणार
सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाही कंत्राटी पद्धतीने सेवेत घेता येणार..वयाच्या ६५ वर्षांपर्यंत करार पद्धतीने सेवेत घेता येणार. नव्या निर्णयाला कर्मचारी, अधिकारी संघटनांचा विरोध
ऑपरेशन सिंदूर'वरून राजकीय नाट्य सुरूच...ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कम्प्युटर गेम, नाना पटोलेंची खोचक टीका...युद्धबंदीवरूनही सवाल उपस्थित...
छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा काही भाग कोसळला, दोन महिलांचा मृत्यू, मनपाकडून पाच लाखांची मदत जाहीर, तर कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करणार
देशभरात मान्सून सक्रिय होणार, आजपासून पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
महाराष्ट्रात १०७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर एकाचा मृत्यू...सध्या राज्यभरात ६१५ सक्रिय रुग्ण...इतर शहरांच्या तुलनेत मुंबई, पुण्यात रुग्णांची संख्या अधिक...
अमेरिकेत १४ जूनला यूएस आर्मी दिनाच्या कार्यक्रमासाठी पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांना आमंत्रण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात बैठकही होणार