Ajit Pawar Beed : ऐकलं नाही तर मकोका लावणार, भर सभेतून अजितदादांची गुंडांना तंबी

Continues below advertisement
बीडमध्ये पालकमंत्री अजित पवार यांनी गुंडांना सज्जड दम दिला आहे. चुकीचं काम करणाऱ्यांना सरकार आता ऐकणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. जर सांगूनही ऐकलं नाही, तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) लावण्यात येईल, असा इशारा अजित पवार यांनी दिला. "मोक्का लावल्यावर मग चक्की पिसिंग-पिसिंग करत आत मध्ये बसा," असंही ते म्हणाले. बीड जिल्ह्यासाठी चांगले अधिकारी दिले जातील, असंही त्यांनी सांगितलं. जिल्ह्यातील सगळ्यांकडून सहकार्याची अपेक्षा असून, कुणीही चुकीचं काम करू नये, असं आवाहन त्यांनी केलं. सरकार आता कुणाचंही चुकीचं काम सहन करणार नाही, असंही अजित पवार यांनी नमूद केलं. शिस्त पाळण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola