Hindutva Politics: राष्ट्रवादीत हिंदुत्वावरून वाद, संग्राम जगतापांना अजित पवारांची नोटीस
Continues below advertisement
अहिल्यानगरचे (Ahilyanagar) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे पक्षांतर्गत वाद निर्माण झाला आहे. 'संग्राम जगताप यांनी केलेले विधान पूर्णपणे चुकीचे आहे, आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवू,' असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले आहे. जगताप यांनी दिवाळीची खरेदी फक्त हिंदुंकडूनच करावी, असे आवाहन केले होते, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. एकीकडे पक्ष त्यांच्यावर नाराज असताना, दुसरीकडे अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप यांचे फोटो असलेले आकाश कंदील मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. या आकाश कंदिलांना नागरिकांकडून प्रचंड मागणी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पक्ष जरी त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर नाराज असला तरी, स्थानिक पातळीवर नागरिकांनी त्यांचे विचार स्वीकारल्याचे चित्र दिसत आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement