Ajit Pawar Irrigation Scam : सिंचन घोटाळा तपासाचा 'दी एंड'? 5 वर्षांत चार्जशीट देखील नाही!
सध्या चर्चेच्या केंद्र स्थानि असलेल्या अजित पवार यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी पहिल्यांदा भ्रष्टाचाराचा आरोप केला तो सिंचन घोटाळ्याचा. पृथ्वीराज चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते. गाडी घर पुरावे घेऊन भाजपचे नेते विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस हे संभाजी नगरच्या विभागी आयुक्त कार्यालयावर गेले होते. त्यानंतर महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली ती पाच वर्ष ठिकली. पुन्हा छोट्या खंडानंतर गेली 9 महिने भाजप सत्तेवर आहे. पण सिंचन घोटाळा आता पूर्णपणे संपला कि काय असा प्रश्न एका निर्णयामुळे पडू लागला आहे. जलसिंचन विभागातील आरोपी अभियंत्यांना पदोन्नती देण्यास महाराष्ट्र प्रशासकीय लवादानं परवानगी दिली आहे. ५ वर्षं उलटूनी आरोपपत्र दाखल न झाल्यानं लवादानं हा निर्णय दिला. मात्र यामुळे सिंचन घोटाळा आणि अजित पवारांच्या अडचणी, या दोन्हीचा दी एंड झाला आहे की काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.