Ajit Pawar IPS officer row | अजित पवारांची कुर्डू प्रकरणात मीडिया ट्रायल, दादा काय म्हणाले?

प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली होती. दरम्यान, कुडू Murum प्रकरणात Ajit Pawar यांच्यावर सर्व स्तरावर टीका होत आहे. कुडू गावात प्रशासनाने केलेली कारवाई नियमानुसारच होती अशी माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. कुडू येथे सुरू असलेल्या Murum उपाशासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती, किंबहुना अर्जही केला नव्हता, असं तहसीलदारांच्या चौकशीत समोर आले होते. त्यामुळे Ajit Pawar यांनी व्हिडिओ कॉल करून अधिकाऱ्याला केलेली दमदाटी वादात अडकली आहे. या प्रकरणात Rohit Pawar यांनी Ajit Pawar यांची पाठराखण केली असून, त्यांची Media Trial सुरू असल्याचं म्हटलंय. मित्र पक्षाच्या नेत्यांची Media Trial घेण्यापेक्षा शेतकरी प्रश्न, युवकांचे प्रश्न, महिला सुरक्षा, भ्रष्टाचार यांची Media Trial राज्याच्या नेतृत्वाने करावी असं Rohit Pawar यांनी म्हटले आहे. Rohit Pawar यांनी आपल्या X पोस्टद्वारे म्हटले की, "घोळ दादांच्या हिंदीमुळे आणि शैलीमुळे झाला." दुसरीकडे, त्यांचे सख्खे पुतणे Yugendra Pawar यांनी Ajit Pawar यांच्यावर टीका केली आहे. Yugendra Pawar म्हणाले, "मला ते आवडत नाही, कुणाला आवडणार? कुणालाही ते आवडत नाही ना शेवटी IPS Officer आहे, एक महिला आहे. तुम्ही काय कसं बोलत आहेत? कशासाठी बोलताही आहे असं म्हणजे चुकीचंच आहे ना?" दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी Ajit Pawar यांची पाठराखण करत जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला असून, आवश्यक कायदेशीर कारवाई झाल्याचे म्हटले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola