Ajit Pawar IPS officer row | Rohini Khadse यांची Ajit Pawar यांना पाठराखण, 'हेतू बघा'

महिला आयपीएसप्रकरणी अजित पवारांच्या वक्तव्यावर रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार चुकीचं बोलले असं वाटत नाही, असे रोहिणी खडसे म्हणाल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे. याआधी रोहित पवार आणि शशिकांत शिंदे यांनी देखील अजित पवारांच्या वक्तव्याचे समर्थन केले होते. या सगळ्या प्रकरणांमध्ये अजित पवारांचा हेतू पाहणे महत्त्वाचे आहे, असे रोहिणी खडसे यांनी सांगितले. "दादांचा स्वभाव हा, त्यांचा बोलण्याचा जो टोन असतो तो हा समोरच्याला बरेचदा असं जाणवतो की ते रागात बोलताहेत. त्यामुळे त्यांनी जे काही बोलले आहेत या बोलण्याचा त्यांचा हेतू काय होता हे बघिणं गरजेचं आहे," असे रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केले. अजित पवारांच्या बोलण्याचा सूर अनेकदा रागाचा वाटू शकतो, परंतु त्यांचा उद्देश काय होता हे समजून घेणे आवश्यक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola