Maharashtra Politics: Ajit Pawar यांचे स्वबळाचे संकेत, एकला चलो रेचा नारा?

Continues below advertisement
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असताना महायुतीमध्ये मतभेद समोर येऊ लागले आहेत. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे महायुतीच्या (Mahayuti) एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'महाविकास आघाडीत असतानाही लोकसभा-विधानसभा वगळता इतर निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्रपणेच लढत' असा दाखला त्यांनी दिला. पुणे येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवार निवड प्रक्रियेच्या बैठकीनंतर बोलताना त्यांनी हे विधान केले. एकीकडे महायुतीचे नेते एकत्र निवडणूक लढवण्यावर भर देत असताना, दुसरीकडे अजित पवारांच्या या भूमिकेमुळे स्थानिक पातळीवर आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola