Ajit Pawar group got party and symbol:फिनिक्सप्रमाणे राखेतून भरारी घेतील;जितेंद्र आव्हाडांचा विश्वास

Continues below advertisement

Ajit Pawar group got party and symbol:फिनिक्सप्रमाणे राखेतून भरारी घेतील;जितेंद्र आव्हाडांचा विश्वास
मुंबई: राष्ट्रवादीच्या घडाळ्याच्या काट्यांचा फैसला लागला असून पक्ष आणि चिन्ह आता अजित पवार गटाला मिळालं आहे. त्यानंतर शरद पवार गटाकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर टीका केली आहे. ज्या बापाने तुम्हाला उभं केलं त्याला सोडून जाताना लाज वाटली नाही का असा सवाल त्यांनी विचारला. शरद पवार हे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आहेत, राख झाली तरी उभा राहतील आणि स्वतःचं विश्व निर्माण करतील त्यांनी म्हटलंय. तसेच शरद पवार हाच आमचा चेहरा आहेत, तेच चिन्हा आणि पक्ष आहेत असंही ते म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram