Ajit Pawar EXCLUSIVE : साहेबांसोबत मतभेद, ताईविरोधात लढाई; दगा फटका झाल्यास दादांची कारकीर्द संपेल?

Continues below advertisement

Ajit Pawar EXCLUSIVE : साहेबांसोबत मतभेद, ताईविरोधात लढाई; दगा फटका झाल्यास दादांची कारकीर्द संपेल?  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एबीपी माझाला EXCLUSIVE मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक मोठी विधानं केली. उद्धव ठाकरेंचं सरकार धोक्यात आलं तेव्हा आम्ही अमित शाहांशी चर्चा करत होतो, असं वक्तव्य अजित पवारांनी पुन्हा एकदा केलं आहे. आम्ही त्याबद्दल शरद पवारांना पत्र देखील दिलं होतं, त्यावर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, प्राजक्त तनपुरे यांच्या देखील सह्या होत्या असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, बहिणीच्या विरोधात प्रचार करताना वेदना होतात का, असा प्रश्न विचारल्यावर अजित पवारांनी थेट उत्तर दिलं. तसंच, शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येणार का, असं देखील आम्ही त्यांना विचारलं. अमरावतीतल्या प्रचार दौऱ्यादरम्यान अजित पवारांशी बातचित केली आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram