Baramati Ajit Pawar : अजित पवारांच्या गांधीगिरीची चर्चा,रस्त्यावरचा कचरा स्वत: उचलून बाजूला केला
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. स्वच्छताप्रियतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांना याआधी अनेकदा आपण कचरा दिसल्यास अधिकारी, कार्यकर्त्यांची कानउघडणी करताना पाहिलंय. पण, आज बारामतीच्या दौऱ्यात कार्यक्रमस्थळी पोहचल्यावर त्यांना रस्त्यावर कचरा दिसला. तेव्हा अजितदादांनी कुणाला काहीही न बोलता स्वत: कचरा उचलून बाजूला केला. त्यामुळे आपल्या कृतीतूनच अजित पवारांनी आता सर्वांना स्वच्छतेचे धडे दिले.