Parth Pawar Land Row : जमीन व्यवहार रद्द, पार्थ पवार वाचणार?
Continues below advertisement
पुण्यातील मुंडवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी राजकारण तापले असून, या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव समोर आले आहे. 'या जमीन गैरव्यवहार प्रकरणाशी आपला काडीचाही संबंध नाही आणि आपल्याला या व्यवहाराची कल्पना नव्हती', असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. अजित पवार यांनी माहिती दिली की हा वादग्रस्त व्यवहार रद्द करण्यात आला आहे. तसेच, या प्रकरणाच्या चौकशीसाठी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्यांनी कागदपत्रांवर सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, पार्थ पवार तिथे उपस्थित नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, असे महसूल मंत्र्यांनी सांगितल्याचेही अजित पवारांनी म्हटले आहे. दुसरीकडे, व्यवहार रद्द करून गुन्हा कसा माफ होऊ शकतो, असा सवाल करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पार्थ पवारांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement