Ajit Pawar Baramati Speech : दादा दादा करु नको, तुझं काम करतो, बारामतीत दादांची मिश्किल टोलेबाजी

Ajit Pawar Baramati Speech : दादा दादा करु नको, तुझं काम करतो, बारामतीत दादांची मिश्किल टोलेबाजी
 लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देत असल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट झाली आहे. आता लाडक्या बहिणींना आम्ही कर्ज देखील देणार आहोत. आठ लाख आठ हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप आम्ही देत आहोत. यासाठी 24000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे  एक लाख तीस हजार घरांकरिता 500 मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा संच आम्ही बसवलेले आहेत. येणाऱ्या काही काळात राज्यातील ग्राहकांचे 70 टक्के वीज बिल टप्प्याटप्प्याने कमी होणार आहे. टेक्निकल लोकांनी आम्हाला सांगितलं की हे शून्यावर येणार आहे पण मला ते ऐकून भीतीच वाटते ती शून्यावर नाही आलं म्हणजे लोक म्हणतात थापा मारतोय शेतकऱ्यांचा आणि लोकांचा आपण फायदा करून देत आहोत.   मी परवा महिंद्रा कंपनीची इलेक्ट्रिक 32 लाखाची गाडी घेतली. कंपनीने 500 किलोमीटरचा दावा केला आहे पण साडेतीनशे किलोमीटर तर ती एकदा चार्ज केल्यावर चालते. मुंबईवरून यायचं इथं आपलं फुकट बारामती मध्ये पोहोचायचं महाराष्ट्रातील प्रत्येक पेट्रोल पंपावर आम्ही आता चार्जिंग स्टेशन करत आहोत त्याशिवाय गत्यंतर नाही.  भविष्यात मोठे ट्रक आणि ट्रॅक्टर देखील इलेक्ट्रिक वर चाललेली दिसतील जगात ते तंत्रज्ञान आला आहे आपल्यात सध्या टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर वर सुरू आहे  काळानुरूप आपल्याला बदलावी लागेल.   ग्रामीण भागाच्या विकासावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे तसं नियोजन सुरू आहे.  महायुतीचं सरकार पुढील काळात सर्व जाती धर्म प्रांत भाषा नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालत राहण्याच आमचं ध्येय आहे महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर आम्ही ठेवत आहोत  तुमच्या सर्वांची साथ मला आठ निवडणुकीत मिळाली आहे या वेळेस देखील तुम्ही मला लाखाच्या फरकाने निवडून दिले त्याबद्दल आपल्याला धन्यवाद आता जबाबदारी तुमची कामे पाच वर्ष चोख पद्धतीने करणे तुमच्या भागाचा विकास करणे रोजगार निर्माण करणे, शिक्षणाची नवीन दालने उघडणे सुविधा देणे या सर्व गोष्टी माझ्याकडून सातत्याने चालतात बारामती मध्ये मुळीक आणि यादव हे दोन पर्सनल असिस्टंट ठेवले आहेत त्यांच्याशी संपर्क साधा ते मला मुंबईला सर्व काही कळवतील   पुढे आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्ताने पुढे यायचं आहे  तुमचे कोण पावणे राबळे असतील तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी त्यांना मिशीवर ताव द्यायला सांगा  मध्येच एक महिला  दादा म्हणाली त्यावर अजित पवार खेकसले म्हणाले गप्प बस तुझं काम करतोय उगाच मध्ये दादा दादा करू नको. तू लाडकी बहीण आहे ना मुळीक तिच्याशी बोलून घ्या तिचं काय काम असेल ते मार्गी लावू इथे काही गाईंबाबत समस्या आहेत सुप्रीम कोर्टाची काळजी थोडी कडक असतात त्यांनी दिलेला न्याय आपल्याला मान्य करावा लागतो. शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत संपन्न घडवण्याचं काम हे आमचे स्वप्न आहे त्यासाठी महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मी मंत्रिमंडळातील सहकारी विकासाचा वेग वाढवण्याचे काम करत आहेत  या ठिकाणी होत असलेलं महावितरणच्या सबस्टेशनचं काम दर्जेदार पद्धतीने करून घ्या.  या भागातील लोकांना नियमती दाबाने आणि व्यवस्थित वीज मिळेल याची काळजी घ्या.  काही लोकांची मला विकास कामा संदर्भात निवेदने मिळाले आहेत.  अलीकडे बारामतीकरांना विकास कामे म्हणजे अशी चुटकी सारखी वाटतात. मला वर्षाला आमदार निधी पाच कोटी रुपये मिळतो म्हणजे पाच वर्षाचा 25 कोटी. यापूर्वी जे सरपंच होते त्या कालखंडात या गावाला वीस कोटी रुपये आले त्यामुळे आमचे बारामतीकर लाखात बोलायला तयारच नाहीत. कोटी कोटी च्यायला अंगात घालायचा कोट आम्हाला माहित नाही आणि यांना कोटी. असं नाही बाबांनो मला महाराष्ट्र बघायचा आहे. बारामतीला पहिल्या शंभर दिवसात साडेपाचशे कोटी रुपयांचं पशुवैद्यकीय मेडिकल कॉलेज मंजूर केले.  पहिल्या शंभर दिवसात 1000 कोटी रुपयांची कामे बारामतीला मी मंजूर केली.  बारामती मध्ये जी कामे सुरू आहे ती दर्जेदार केली पाहिजेत झाडे लावले पाहिजेत.  माझी जबाबदारी आहे ते मी पार पाडीन पण तुमची पण काहीतरी जबाबदारी आहे.  कॅनॉल बंद करण्याची वेळ आली तरी देखील लोणी बापकर यास इतर भागाला पाणी कमी पडणार नाही याची व्यवस्था करत आहे.  तुम्ही मला निवडून दिल आहे म्हणून ते होतं. दवाखान्यात करिता मी व्यवस्था निर्माण केली आहे, गरिबाच्या घरातील ऑपरेशन असेल तर मोफत करून देण्याची जबाबदारी माझी राहील. एका महिलेला अजित पवारांनी विचारलं की तुमचं काय काम आहे. त्यांचं घर गायरान मध्ये आहे. ते सरकारी जागेत जात आहे मी तुम्हाला दुसरी जागा देतो तिथे घर बांधा. आता तुम्ही हातपाय पसरू नका देतो म्हटल्यानंतर तुम्ही हातपाय पसरायला लागला काय.  नवीन घर होईपर्यंत तुम्ही त्या घरात राहायचं. नवीन घर झाल्यावर तिथे वास्तुशांती घालायची मला जेवायला बोलवायचं बारामती मध्ये आता साडेसहाशे कोटी रुपयांचा कारखाना मंजूर केला आहे.  त्यामुळे रोजगाराच्या संधी मिळतील.  सर्वांना नोकरी मिळेल असे नाही काहींनी स्वतःचे व्यवसाय करावीत त्यांना बँकेमार्फत कर्ज देऊ. सारथी मार्फत कर्ज काढा त्याचं व्याज सरकार भरतं. व्यवसाय करा.  परवा पुण्यात आम्ही महिलांना 1000 पेक्षा अधिक रिक्षा आम्ही दिल्या आहेत. या इलेक्ट्रिक वर चालतात.   मधेच एक जण म्हणाला गावात पीडीसी बँक नाही बँक पाहिजे त्यावर अजित पवार म्हणाले थांब तुम्हाला बोलायला संधी दिली की लई चुरू चुरू करता. बारामती तालुक्यात वडगाव निंबाळकर आणि लोणी भापकरला आहे टप्प्याटप्प्याने बँकेच्या शाखा दिल्या जातील.  नाना तीन आठवडे दौऱ्यावर चालले आहेत. 22 दिवस चालले आहेत युरोपचा अभ्यास दौरा आहे. सभेत अचानक एकाने मुडाळे गावाला एसटी चालू करण्याची मागणी केली यावर अजित पवारांनी हाताची घडी घालत मिमिक्री करत संबंधितांना उत्तर दिलं. महाराष्ट्रात नाही असं एसटी स्टँड बारामती मध्ये बांधला आहे. नव्या बसेस देत आहे मुलांना मुलींना मोफत सायकली देत आहे रस्ते चांगले करत आहे. पूर्वी लोक चालत जायची. एसटीला सांगा की या गावाला एसटी सुरू करा अशी सूचना अजित पवारांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola