Ajit Pawar Baramati : कार्यकर्त्यांकडून अजितदादांच्या स्वागताची जय्यत तयारी
महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच बारामतीभोवती घिरट्या घालत होतं. त्याला आजचाही अपवाद नाही. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदा बारामतीमध्ये येतायंत. त्यामुळे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलीय. या आधी दर शनिवारी किंवा रविवारी बारामतीत जनता दरबार घेणारे अजित पवार राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर तब्बल दोन महिन्यांनंतर बारामतीत येतायंत. या निमित्ताने अजित पवार गटाचं जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. यावेळी कारभारी चौक ते शारदा प्रांगण या दरम्यान अजित पवारांची भव्य रॅलीही काढण्यात येणाराय. आणि रॅलीनंतर शारदा प्रांगणात अजित पवार सभा घेणार आहेत. शरद पवारांचं कालचं वक्तव्य आणि अजित पवारांची सभा, त्यामुळे अजित पवार काय बोलणार, याकडे बारामतीकरांसह अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय