Ajit Pawar :विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊ शकत होतो, मात्र आम्हाला राज्यपालांचा अनादर करायचा नाही

Continues below advertisement

 आम्ही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊ शकत होतो, मात्र आम्हाला राज्यपालांचा अनादर करायचा नाही, म्हणून निवडणूक घेतली नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. याबाबत आम्ही राज्यपालांना पुन्हा भेटणार असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत घटनातज्ञांचा सल्ला घेणार आहे. ज्या घटनात्मक बाबी उपस्थित केल्या आहेत, त्याबाबतही तज्ञांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपालांचा आदर राखूनच आम्हाला राज्य चालवायचे आहे. मात्र, काहींना समजूतदारपणा आणि असमजूतदारपणा यामधील फरकच कळत नसल्याचे म्हणत अजित पवारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. विधनसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत आम्ही समजूतदारपणा दाखवला असल्याचे पवार म्हणाले. पहाटेच्या शपथविधीबद्दल देखील अजित पवार यांना विचारण्यात आले, यावर अजित पवार यांनी बोलण्यास नकार दिला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram