Ajit Pawar on Coromandal Express Accident : अत्याधुनिक तंत्रज्ञान असूनही अपघात का घडला? अजित पवारांचा सवाल
Ajit Pawar on Coromandal Express Accident : अत्याधुनिक तंत्रज्ञान असूनही अपघात का घडला? अजित पवारांचा सवाल
शुक्रवारी (2 मे) सायंकाळी हा रेल्वे अपघात झाला. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली. मात्र, आता ओदिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी या अपघाताबाबत मोठी माहिती दिली आहे. या अपघातात एकूण 3 गाड्यांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कोरोमंडल एक्सप्रेसच्या 7 बोगींचं नुकसान झालं आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणथी वाढण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
मदत आणि बचाव कार्याला गती देण्याच्या प्रशासनाच्या सूचना
राज्याच्या मुख्य सचिवांनी या अपघाताबाबत बोलताना सांगितलं की, आधी हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडी एकमेकांवर आदळली आणि नंतर कोरोमंडल एक्स्प्रेस मागून आली, त्यामुळे भीषण अपघात झाला. आतापर्यंत 10 प्रवाशांना बालासोर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या इतर प्रवाशांना सोरो सीएचसी, गोपाळपूर सीएचसी आणि खंटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. याशिवाय 32 जणांची एनडीआरएफ टीम बचावासाठी पाठवण्यात आली आहे.
दुसरीकडे, ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितलं की, लोकांना नेण्यासाठी सुमारे 50 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, परंतु जखमींची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे जखमींना रुग्णालयात नेण्यासा