Ajit Pawar : सत्तेत सहभागी होण्याआधीच अर्थखातं मागितलं होतं- अजित पवार
Continues below advertisement
सत्तेत सहभागी होण्यापूर्वीच आपल्याला वित्त खाते हवे असल्याची भुमिका अमित शाह यांच्या समोरं मांडली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस याना त्यांच्याकडेच वित्त खाते असावे अशी भावना होती. परंतु माझ्या आग्रहामुळे अर्थ खाते माझ्याकडे आले. परंतु देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं प्रोटोकॉल नुसार ते वरिष्ठ असल्याने सुरुवातीला फाईल माझ्याकडे येईल त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल आणि मगच मुख्यमंत्र्यांकडे जाईल असा निर्णय झाला. तशी माझीच भुमिका होती असं ही अजित पवार म्हणाले
Continues below advertisement