Ajit Pawar on Sharad Pawar Retirement : साहेबांचा सांगावा घेऊन आलोय, विचार करण्यासाठी 2-3 दिवस द्या
Ajit Pawar on Sharad Pawar Retirement : साहेबांचा सांगावा घेऊन आलोय, विचार करण्यासाठी 2-3 दिवस द्या
Sharad Pawar Retirement: शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला. त्याचवेळी जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या बड्या नेत्यांना अश्रूही रोखता आले नाहीत. त्याचवेळी दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर काहीवेळा अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावलं, काही वेळा समजावलं, काही वेळा झापलंही. याशिवाय अजित पवारांनी शरद पवारांच्या निवृत्तीचं कारण सांगितलं. वयामुळे हा निर्णय कधी ना कधी घ्यावाच लागेल, असं अजित पवार म्हणाले.