Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावरुन अजित पवार आणि फडणवीसांमध्ये जुंपली ABP Majha
शिंदे सरकारच्या कॅबिनेटची आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. या बैठकीत नामांतर आणि नामकरणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीने अल्पमतात असताना शेवटच्या कॅबिनेटमध्ये नामांतर आणि नामकरणाचे निर्णय घाईने घेतल्याचा आरोप मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केलाय.. त्यामुळे औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असं नामांतर करण्याच्या निर्णयावर आज शिक्कामोर्तब करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तसंच नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याच्या निर्णयावरही शिक्कामोर्तब केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. याशिवाय मुंबईतील मेट्रोच्या कामांचा आढावा आजच्या कॅबिनेटमध्ये घेतला जाणार आहगे. मेट्रोल वेळेत पूर्ण न झाल्याने वाढीव निधी देण्याच्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
Tags :
Mumbai Aurangabad Meeting Osmanabad Cabinet Chief Minister Mahavikas Aghadi Deputy Chief Minister Sambhajinagar Dharashiv Sahyadri Guest House Shinde Government