Pune Land Scam: 'चौकशी समिती योग्य अहवाल देईल', Mundhwa जमीन प्रकरणी Ajit Pawar यांची नवी भूमिका

Continues below advertisement
पुण्यातील मुंडवा येथील सरकारी जमीन खरेदी-विक्रीच्या वादग्रस्त व्यवहारामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'चौकशी समिती योग्यप्रकारे तपास करून अहवाल देणार आहे', असे सांगत अजित पवार यांनी या प्रकरणावर आपली ताजी भूमिका मांडली आहे. सुरुवातीला 'नो कमेंट्स' म्हणणारे अजित पवार यांनी नंतर या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर हा व्यवहार रद्द झाल्याची माहिती त्यांनी दिली. सुमारे १८०० कोटी रुपयांची सरकारी जमीन केवळ ३०० कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या कंपनीचा सहभाग असल्याचे समोर आल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवार अडचणीत सापडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली असून, या समितीच्या अहवालानंतर पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola