Ajit Pawar Full PC : शरद पवारांवर टीका, अजितदादांचा संताप, Sadabhau khot यांना म्हणाले...

Continues below advertisement

Ajit Pawar On Sadabhau khot : विनाशकाली विपरीत बुद्धी, शरद पवारांवर टीका,अजितदादांचा संताप

खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात आली. राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाने तर खोत यांनी माफी मागावी अशी मागणी केली. दरम्यान, सध्याची राजकीय परिस्थित पाहून तसेच केलेले विधान निवडणुकीत अडचणीचे ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन सदाभाऊ खोत यांची भाषा नरमली आहे. त्यांनी केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.
सदाभाऊ खोत यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे.

सदाभाऊ खोत माफी मागताना काय म्हणाले?

सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत दिलगीरी व्यक्त केली आहे. ही दिलगिरी व्यक्त करत असताना त्यांनी ग्रामीण भाषेचा दाखला दिला आहे. मी बोललेली भाषा ही गावगाड्याची भाषा आहे, असे ते म्हणाले. "कुणाच्या व्यंगाला उद्देशून बोलण्याचा माझा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे. परंतु काही लोकांनी त्या शब्दांचा विपर्यास केला. त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते शब्द मी मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो," असे खोत म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram