MCA Elections: अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बड्या नेत्यांची माघार, Ajinkya Naik यांची बिनविरोध निवड
Continues below advertisement
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडींनंतर विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये इतर उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे अजिंक्य नाईक यांचा मार्ग मोकळा झाला. या निवडणुकीत प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड, विहंग सरनाईक, मिलिंद नार्वेकर, शाह आलम शेख आणि माजी भारतीय महिला क्रिकेटपटू डायना एडलजी यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या राजकीय घडामोडींनंतर नाईक यांची निवड बिनविरोध झाली असली तरी, असोसिएशनच्या इतर पदांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे एमसीएच्या कार्यकारिणीत कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement