Ajay Maharaj Baraskar: रांजणगाव, लोणावळ्यात गुप्त बैठका घेतल्या, जरांगे समाजाला फसवत आहेत
Ajay Maharaj Baraskar: खोटं बोलतो, पलटी मारतो, नाटकी माणूस, Manoj Jarange यांच्यावर सर्वात मोठे आरोप
Ajay Maharaj Baraskar vs Manoj Jarange : एकीकडे राज्य सरकारने मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतर दुसरीकडे मराठा संघटनेत फुट पडल्याचं दिसून येतंय. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे सोबती अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांनी जरांगे यांच्यावर अनेक आरोप करत टीका केलीय. जरांगे यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केला असा आरोप त्यांनी केला. तसेच मी पाणी पाजायला गेलो असताना त्यांनी संत-फिंतगेले खड्ड्यात असं वक्तव्य केलं असंही त्यांनी सांगितल.
मनोज जरांगे हे हेकेखोर असल्याचा आरोप अजय महाराज बारसकर यांनी केला. मी जरांगेंच्या प्रत्येक कृतीला साक्षी आहे , मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी काही करतोय मात्र बिलकुल नाही, मी कीर्तन करण्याचेही पैसे घेत नाही असं सांगत अनेक दिवसांपासून आपल्या मनात खदखद असल्याचं त्यांनी सांगितलं.