Ajanta Verul Caves पाहण्यासाठी येत असलेल्या पर्यटकांनी उग्र वासाचे परफ्युम ,लाल रंगाचे कपडे टाळावे
संभाजीनगरमधील अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी.. अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी येत असलेल्या पर्यटकांनी उग्र वासाचे परफ्युम आणि लाल रंगाचे कपडे घालून येऊ नये असं आवाहन पुरातत्व विभागाने केलंय.. अजिंठा लेणी परिसरात काही दिवसांपासून वाढलेल्या मधमाश्यांच्या हल्ल्यानंतर हे आवाहन करण्यात आलंय.. अजिंठ्यात २० पर्यटक आणि ६ कर्मचाऱ्यांवर मधमाशांनी हल्ला केला होता.. त्यानंतर पुरातत्त्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणात उग्र वासाचे परफ्यूम आणि लाल रंगाच्या कपड्यामुळे हे झाल्याचं समोर आलंय.