Air India Express terminates 30 employees : आजरपणाचं कारण देत सामूहिक रजेवर, 30 कर्मचारी थेट बडतर्फ
Continues below advertisement
Air India Express terminates 30 employees : आजरपणाचं कारण देत सामूहिक रजेवर, 30 कर्मचारी थेट बडतर्फ
Air India Express Flight Cancelled: एअर इंडिया एक्सप्रेसनं (Air India Express) 'सिक लीव्ह'वर गेलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. एअर इंडिया एक्सप्रेसनं अशा कर्मचाऱ्यांना कंपनीचा दैनंदिन कारभारात अडथळा आणल्याबद्दल आणि नियुक्तीच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी मानून त्यांना बडतर्फीची नोटीस धाडली आहे. दरम्यान, एअर इंडिया एक्सप्रेसच्या 100 हून अधिक क्रू मेंबर्सनी बुधवारी आजारी असल्याची सबब देत अचानक रजा घेतल्या. त्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसची 80 हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली. या प्रकाराबाबत असंही सांगितलं जात आहे की, कर्मचाऱ्यांचं अचानक रजा घेणं म्हणजे, एक प्रकारचा संपच आहे.
Continues below advertisement