AI in Schools: 'तिसऱ्या वर्गापासून शिकवणार AI', शिक्षण मंत्रालयाचे सचिव Sanjay Kumar यांची मोठी घोषणा

Continues below advertisement
केंद्र सरकार (Central Government) आता तिसऱ्या वर्गापासून मुलांना एआय (AI) तंत्रज्ञान शिकवणार आहे. शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार (Sanjay Kumar) यांनी ही माहिती दिली आहे. 'केंद्र सरकार आणि राज्य सरकारसह केंद्रशासित प्रदेशांमधल्या सर्व शाळांच्या अभ्यासक्रमामध्ये एआय विषय समाविष्ट केला जाईल', असं संजय कुमार यांनी स्पष्ट केलं. ही योजना २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांत तिसरीच्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी केली जाईल, असंही सांगण्यात आलं. हा अभ्यासक्रम नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन (NCF SE) 2023 च्या धर्तीवर असेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola