Rekha Jare Murder | यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरेंची हत्या, हत्येमागे कुणाचा हात?

Continues below advertisement

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या करण्यात आली. पारनेर तालुक्यातील जातेगाव फाट्याजवळील घाटात त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली. त्यांना तातडीने अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

रेखा जरे या सोमवारी (30 नोव्हेंबर) आपला मुलगा आणि आईसोबत पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी पारनेर तालुक्यातील जातेगाव फाट्याजवळील घाटात त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखारांनी तीक्ष्ण शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले.  त्यांना त्वरीत अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा आधीच मृत्यू झाला होता.

रेखा जरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या. मात्र नंतर त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी यशस्विनी महिला ब्रिगेड ही संघटना स्थापन केली होती. दरम्यान रेखा जरे यांची हत्या नेमकी का केली याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र त्यांच्या हत्येने जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola