#Potholes अहमदनगर-मनमाड महामार्गावर रस्त्यांची चाळण, अनेकांचे जीव गेले, वाहनांचंही नुकसान
अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गाची खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाली आहे. अहमदनगर मनमाड महामार्ग वाहनचालकांसाठी डोकेदुखी झाला आहे. खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी भीषण अवस्था या महामार्गाची झाली आहे. हजारो वाहनं या रस्त्यावरून दररोज धावत असतात अनेक राज्यांना जोडणारा हा महामार्ग असल्याने जड वाहनांसह चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते, मात्र कोपरगाव ते अहमदनगर पर्यंतचा 100 किमी महामार्गावर मोठे खड्डे पडले आहे त्यामुळे अनेक अपघात होत असून अनेकांना जीव गमवावा लागलाय, तर वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. लवकरात लवकर या महामार्गाची दुरूस्ती करणं गरजेचे आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी.
Tags :
Pothole Death Ahmednagar Manmad Highway Manmad Highway Shirdi Pothole Potholes Shirdi Ahmednagar Nashik