Ahmednagar Kopargaon : दोन गटातल्या वादात अर्ध गाव बेघर, गायरानावर अतिक्रमण, प्रशासनाची कारवाई
Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर गायरानावरील अतिक्रमणावर मोठी कारवाई करण्यात आलीय. कोपरगाव तालुक्यातील धोंडवाडी गावात तब्बल सव्वाशेहून अधिक घरं जमिनदोस्त करण्यात आलीत. कोपरगाव तालुक्यातील धोंडवाडी येथे 133 कुटुंबांनी गावातील गायरान जमिनीवर अतिक्रमण करत पक्की घरं उभारली होती.