अहमदनगरच्या शेतकऱ्याची यशोगाथा, 60-62 दिवसांत तब्बल 100 टन कलिंगडाचं उत्पादन
Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील वीरगाव येथील विश्व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात आणि वाटेकरी श्याम अस्वले यांनी वर्षभरात एकाच शेतात, एकाच बेडवर तीन पिके घेऊन यशस्वी होण्याची किमया साधलीय. विशेष म्हणजे हंगाम नसतानाही चार एकरावर कलिंगडाची लागवड करुन तब्बल 60-62 दिवसांत तब्बल 100 टन उत्पादन घेतले आहे. यात 3 लाख 20 हजार रुपयांचा खर्च करून 20 लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोविड आणि निसर्ग संकटांनी ग्रस्त असलेल्या शेतकर्यांना यातून प्रेरणा मिळेल हे मात्र नक्की..
Continues below advertisement