Ahmednagar Accident : मांजरीला वाचवताना पाच जणांचा बायोगॅसच्या खड्ड्यात पडून जीव गेला

Continues below advertisement

Ahmednagar Accident : मांजरीला वाचवताना पाच जणांचा बायोगॅसच्या खड्ड्यात पडून जीव गेला नेवासा तालुक्यातील वाकडी या गावात आज संध्याकाळच्या सुमारास तब्बल दोनशे फूट खोल असलेल्या बायोगॅसच्या शोष खड्ड्यात मांजर पडलं आणि त्याला वाचवण्यासाठी एक जण खाली उतरला .. मात्र त्याला बाहेर यता येत नसल्यानं एका मागे सहाजण एकमेकांना वाचवण्यासाठी त्या खड्यात अडकले... घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी या विहिरीजवळ धाव घेतली मात्र शोष खड्ड्यात शेणाचं प्रमाण जास्त असल्याने शोध कार्य अद्यापही सुरूच आहे... परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने एकाला लवकर बाहेर काढण्यात आलं मात्र इतर 5 जणांचा अद्यापही शोध सुरूच आहे... प्रशासन व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले मात्र सामानाची उपलब्धता नसल्याने शोष खड्ड्यात पडलेल्यांना बाहेर काढणं अवघड होऊन बसलय... रात्रीच्या वेळेस अंधार पडल्याने लाईटची व्यवस्था करत पुन्हा एकदा शोधकार्य सुरू केला आहे... या खड्ड्यात पडलेले सगळे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली असून नेमका हा सगळा प्रकार कसा घडला हे तपासांती समोर येईल... मात्र सध्या या खड्ड्यात पडलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram