Ahmedabad-Mumbai Tejas Express | अहमदाबाद-मुंबई तेजस एक्स्प्रेसमधील रेल्वे सुंदरींच्या पोषाखात बदल | ABP Majha

पश्चिम रेल्वे मार्गावर कालपासून (17 जानेवारी) पहिली खासगी तेजस एक्स्प्रेस धावू लागली आहे. मुंबई-अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या या रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या रेल्वे सुंदरी (Train Hostess) आणि त्यांच्या पोशाखावरून वाद निर्माण झाला होता. हा पोशाख केवळ गुजराती काठवाडी पद्धतीचाच असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यास विरोध केला होता. होस्टेसचा पोशाख महाराष्ट्रीय पद्धतीचादेखील असावा अशी मागणी मनसेने केली होती. हा वाद अधिक वाढून नये म्हणून रेल्वेने माघार घेतली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola