Radhakrishna Vikhe Patil | जिल्हा परिषदचा अध्यक्ष भाजपचाच होणार, राधाकृष्ण विखेंना विश्वास | अहमदनगर | ABP Majha
बातमी अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीसंदर्भातील... ३१ डिसेंबरला भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष होणार, असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय. मात्र, अध्यक्षपदाचा उमेदवार कोण? निवडणुकीत कुणाची साथ घेणार? हे निवडणुकीदिवशी स्पष्ट होईल असंही विखे-पाटील म्हणालेत. महत्वाची बाब म्हणजे सध्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. त्या काय निर्णय घेतील हे भविष्यात कळेल, असंही विखे म्हणालेत. दुसरीकडं राम शिंदेंच्या नाराजीबाबत पक्ष घेईल तो निर्णय सर्वांना मान्य असेल, असं विखे म्हणालेत.. तर राम शिंदे यांनी नाराजीच्या मुद्द्यावर बोलणं टाळलंय.