Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षात मानव-वन्यजीव संघर्ष (Man-Wildlife Conflict) टोकाला गेला आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये (Chandrapur Tiger Attack) ग्रामीण भागातील लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शेतात काम करणारे लोकं आणि गुराखी हे या वाघांच्या हल्ल्यात (Tiger Attack) बळी पडत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, यावर उपाय म्हणून सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गुराखी आणि ग्रामस्थांना त्रिशूल असलेली काठी, इलेक्ट्रिक करंट असलेली स्टिक, मानवी मुखवटे आणि घुंगरू असलेली काठी यासह इतर साहित्य वाटप करण्यात आले आहे. या साहित्यामुळे अचानक वन्यप्राण्यांचा हल्ला झाल्यास बचाव करणे सोपं जाईल, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे काही प्रमाणात तरी मानव-वन्यजीव संघर्ष टाळता येईल ही अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात कुठे बिबट्यांची तर कुठे रानटी हत्तीसह वाघांचे सर्रास वावर होतांना दिसतो आहे. परिणामी यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचल्याचेही भयावह चित्र निर्माण झाले आहे. अशातच उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या भीतीमुळे (Leopard Attack) तरुणांची सोयरीक जुळता जुळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो तरुणांची लग्न रखडल्याची खंत नागरिक व्यक्त करत आह तर दुसरीकडे चंद्रपुरात वाघांची प्रचंड दहशत निर्माण होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागेल आहे. यावर आता वन विभागाकडून तोडगा काढण्यात आला आहे. वाघांच्या हल्ल्यांपासून बचावासाठी गुराखी आणि ग्रामस्थांना त्रिशूल असलेली काठी, इलेक्ट्रिक करंट असलेली स्टिक, मानवी मुखवटे आणि घुंगरू असलेली काठी वितरित करण्यात आली आहे. आता या साहित्याचा कितपत फायदा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.