Ahilyanagar Heavy Rain | अहिल्यानगरमध्ये पूरस्थिती, पालकमंत्री Radhakrishna Vikhe Patil पाहणी करणार
अहिल्यानगर जिल्ह्याला मागील दोन दिवसांपासून जोरदार पावसाने झोडपले आहे. यात शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांना पावसाचा मोठा फटका बसला. काल मध्यरात्रीपासून पाथर्डी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी, शेवगाव तालुक्यात रात्रभर पाऊस सुरू असल्याने नाले तुडूंब भरून वाहत आहेत. करंजी गावामध्ये आमराई ओढ्याचे पाणी शिरल्याने जवळपास पन्नास कुटुंबांना फटका बसला. या पुरात दहा जनावरे, तीन ट्रॅक्टर, दोन दुचाकी आणि चार चारचाकी वाहून गेली आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज सकाळी साडे दहा वाजता नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू करणार आहेत. ते संध्याकाळी साडे चार वाजेपर्यंत शेवगाव आणि पाथर्डी येथील नुकसानीची पाहणी करतील. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला असून, आजही सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे.