Raj Thackeray And CM : निवडणुकीच्या तोंडावर मु्ख्यमंत्री Eknath Shinde - राज ठाकरे जवळीकीची चर्चा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गणेशोत्सवापासून आतापर्यंत दोन्ही नेते अनेकदा एकत्र आलेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी गणेशोत्सवात राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं आणि मग राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन गणेशदर्शन केलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा वर्षा निवासस्थानी जाऊन एका कामानिमित्त भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आरोग्यमंत्री आणि अधिकाऱ्यांबरोबर बैठकही झाली. त्यानंतर शिवाजी पार्कमधील मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंबरोबर एकत्र आले होते. आज पुन्हा एकदा दोन्ही नेते एकत्र येत असल्यानं त्यांच्या वाढत्या जवळीकीची चर्चा सुरु झालीय....