Ahmednagar Leopard Attack | पाथर्डीत बिबट्याने तीन वर्षांच्या मुलाला घरातून उचलून नेलं,मुलाचा मृत्यू
नगरमधील पाथर्डी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे पाथर्डीतील गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. पाथर्डी तीळ करडवाडी येथील तीन वर्षांच्या मुलाला बिबट्याने घरातून उचलून नेलं होतं. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच त्यांनी मुलाला शोधण्यासाठी शोधमोहिमही सुरु केली होती. त्यानंतर आज सकाळी या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात या तीन वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.