Ahmednagar : कृषीमंत्री दादा भुसे आज पुणतांब्यातील आंदोलकांची भेट घेणार
Continues below advertisement
Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात सुरु असलेल्या आंदोलनाची सरकारने दखल घेतलीय. कृषीमंत्री दादा भुसे आज पुणतांब्यातील आंदोलकांची भेट घेणार आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी काल दादा भुसे आणि आंदोलकांची फोनद्वारे चर्चा घडवून आणली. यावेळी भुसे यांनी आंदोलकांशी मागण्यांबाबत चर्चा केली. आज स्वतः दादा भुसे पुणतांब्यात येऊन मागण्यांबाबत घोषणा करतील. त्यामुळे आंदोलकांच्या मागण्या मान्य होणार का याकडं लक्ष लागलंय. याशिवाय भाजप नेते अनिल बोंडे, राधाकृष्ण विखे पाटीलही आंदोलकांची भेट घेणार आहेत..
Continues below advertisement