Bonus Row: 'गेल्या वर्षी 5000, यंदा 1100 रुपये का?', Agra-Lucknow Expressway वर कर्मचाऱ्यांचा संताप

Continues below advertisement
आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर (Agra-Lucknow Expressway) दिवाळी बोनसच्या (Diwali Bonus) मुद्द्यावरून मोठा गोंधळ उडाला. टोल कंत्राटदार कंपनी 'श्री साई अँड दातार' (Shri Sai & Datar Company) आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद पेटला. 'आम्ही एवढी मेहनत करतो, पण कंपनीने काहीच बोनस दिला नाही', अशी संतप्त प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली. गेल्या वर्षी ५००० रुपये बोनस मिळाला असताना यंदा केवळ ११०० रुपये दिल्याने कर्मचारी आक्रमक झाले. धनत्रयोदशीच्या दिवशी झालेल्या या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी टोलनाक्याचे सर्व दरवाजे उघडे केले, ज्यामुळे हजारो वाहने टोल न भरताच मोफत गेली. यामुळे कंपनीला लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आणि पगारवाढीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola