Nanded Lockdown Again | लॉकडाऊनच्या वर्षपूर्तीलाच नांदेड, बीडमध्ये कडक लॉकडाऊन

Continues below advertisement

वाढत्या करून रुग्णांच्या संख्येत आळा बसावा म्हणून बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. उद्या (25 मार्च)  म्हणजे गुरुवारी रात्री बारा वाजल्यापासून 4 एप्रिलच्या बारा वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. विशेष म्हणजे या दरम्यान जिल्ह्यातील पूर्ण वाहतूक व्यवस्था बंद असेल अत्यावश्यक सेवा जरी चालू असल्या तरी किराणा दुकाने मात्र सकाळी 7 ते 9 या दोन तासाच्या वेळेमध्ये सुरू असतील तेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन सुरु ठेवावीत असे आदेश बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत.

तर नांदेड जिल्ह्यातही आज मध्यरात्री पासून कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वाढता कोरोना रुग्णसंख्येचा आकडा लक्षात घेऊन ही कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 25 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या-36 हजारावर गेली आहे.  गेल्या 15 दिवसातील कोरोना रुग्णसंख्या 9 हजारावर गेली आहे. कालचा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 30 होता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram