Ajit Pawar meets Sharad Pawar : शरद पवारांच्या चर्चेनंतर देवगिरीवर खलबतं, अजितदादा गटाची चर्चा सुरु
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवारांसह त्यांचा गट अचानक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये गेला आणि शरद पवार यांची भेट घेतली. एवढंच नाही तर अजित पवार गटाकडून दिलगिरी व्यक्त करून झालेला गुंता सोडवण्याची विनंती केली. यावर शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय. या घटनेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. अजित पवार गटाची 'देवगिरी'वर बैठक झाली. त्या बैठकीनंतर अजित पवार गटाचे नेते अचानक वाय. बी. चव्हाण सेंटरवर शरद पवारांच्या भेटीला आले. यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. आजची ही घडामोड अनपेक्षित होती. आणि यातून राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण लागू शकेल, अशी शक्यता वर्तवली जातेय..