
Shivsena : Santosh Kharat शिंदे गटात गेल्यानंतर ठाकरे आक्रमक, पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनात बैठक
Continues below advertisement
ठाकरेंच्या शिवसेनेचे वरळीतील माजी नगरसेवक संतोष खरात शिंदे गटामध्ये दाखल झाल्यानंतर स्थानिक आमदार आदित्य ठाकरे सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. आदित्य ठाकरेंनी वरळीमधल्या शिवसेना दाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना भवनावर बोलावली होती. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी वरळीत काहीही केलं तरी आदित्य ठाकरेच निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला. तसंच वरळीतील कामांना रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही सचिन अहिर यांनी केली
Continues below advertisement