Jarang On Farmers Loss : मराठा आंदोलनानंतर आता शेतकऱ्यांसाठी लढा, जरांगेंची नवी घोषणा

Continues below advertisement
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आता आपला लढा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी असेल अशी घोषणा केली आहे. 'शेतकऱ्यांसाठीचा आपला पुढचा लढा असेल', असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी यशस्वी लढा उभारल्यानंतर, जरांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन मैदानात उतरणार आहेत. या नव्या लढ्याची रणनीती ठरवण्यासाठी ते लवकरच अंतरवली सराटी (Antarwali Sarati) येथे शेतकरी आणि अभ्यासकांची बैठक बोलावणार आहेत. या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola