Dr.Kurulkar Honey Trap Case : कुरुलकरनंतर आणखी एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये, मोबाईल ATSच्या ताब्यात
पुणे DRDO मधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅपमध्ये सापडल्याचं स्पष्ट झालंय... गंभीर बाब म्हणजे कुरुलकरने ब्रह्मोस, अग्नी आणि उपग्रहरोधी क्षेपणास्रांची माहिती पाकिस्ताना ला पुरवल्याची बाब समोर येतेय. या तपासातील माहिती पंतप्रधान तसेच संबंधित विभागाला देण्यात आलीय. दरम्यान, गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याकडूनही अशीच माहिती मिळवण्याचा प्रयत्न याच पाकिस्तानी महिला एजंटने केला होता, अशीही माहिती समोर आलीय. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एटीएसने कुरुलकरला पाकिस्तानी महिला एजंटला गोपनीय माहिती देण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर कुरुलकरकडून अनेक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. कुरुलकरच्या फोन कॉल यादीत या अधिकाऱ्याचं नाव पुढे आलंय... त्यानंतर एटीएसने त्या अधिकाऱ्याचा मोबाईल जप्त केला आहे प्रत्यक्षात या अधिकाऱ्याने गोपनीय कागदपत्रे दिली का, याची माहिती महाराष्ट्र एटीएस घेत आहे. पाकिस्तानी महिलेचे नग्न व्हिडीओ पाहता यावेत म्हणून कुरुलकर यांने भारताच्या क्षेपणास्त्रांची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवल्याचं समोर येते