Adv. Asim Sarode : असीम सरोदेंची सनद तीन महिन्यांसाठी निलंबित, वादग्रस्त वक्तव्य भोवलं

Continues below advertisement
वकील असीम सरोदे (Advocate Asim Sarode) यांची सनद तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली असून, राज्यपाल (Governor) आणि विधानसभा अध्यक्षांवरील (Assembly Speaker) वादग्रस्त वक्तव्यांप्रकरणी बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा (Bar Council of Maharashtra and Goa) यांनी ही कारवाई केली आहे. 'जजमेंटची कॉपी वाचल्यानंतर मी बोलेन,' अशी पहिली प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी या कारवाईवर दिली आहे. सार्वजनिक कार्यक्रमात राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई झाली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सरोदे यांनी राज्यपालांसाठी 'फालतू' असा शब्द वापरला होता. १९ मार्च २०२४ रोजी याविरोधात तक्रार दाखल झाली होती. बार काउंसिलने सरोदे यांना लेखी माफी मागण्याची संधी दिली होती, मात्र त्यांनी ती नाकारली. त्यामुळे विवेकानंद घाडगे (Vivekanand Ghadge) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola